गृहनिर्माण संस्था : निवडणूक संभ्रम कायम
करोना विषाणमुळे उद्भवलेल्या सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, अद्यापही
साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ कक मधील तरतुदीप्रमाणे,
राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी
संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. या तरतुदीनुसार करोना आणि
त्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती
विचारात घेता, विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या
निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आता शासनाच्या सहकार विभागाने २ फेब्रुवारी २०२१
रोजी करोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील
सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी
असा आदेश काढला आहे. यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थाचे पदाधिकारी आणि
सदस्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. Read More...
No comments:
Post a Comment